7 व्या वेतन आयोगानुसार , राज्यातील या कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता लागु करणेबाबत GR निर्गमित !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued regarding implementation of overtime allowance to these employees in the state ] :  सातव्या वेतन आयोगानुसार अतिकालिक भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवा , वरळी , मुंबई या कार्यालयातील वाहनचालकांना मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961 मधील कलम – 26 ( 4 ) नुसार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अतिकालिक भत्ता पुढील अटीच्या अधीन राहून मंजूर करण्यास शासन मंजूरी देण्यात आलेली आहे .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , शासकीय परिवहन सेवेतील वाहनचालक यांना प्रतिदिन कामाचे 8 तास सेवा अधिक अर्धा तास जेवण व अर्धा तास विश्रांती असे एकुण 09 तास सेवा झाल्यानंतर पुढील अतिरिक्त तासाकरीता अतिकालिक भत्ता लागु राहील असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तर मोटार अधिनियम 1961 मधील कलम – 13 नुसार कामगाराला कोणत्याही दिवशी 8 तासांपेक्षा व आठवड्याला 48 तासांपेक्षा अधिक वेळ काम करावयास लावले जाणार नाहीत , तर तशी मुभा दिली जाणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . परंतु प्रकरणपरत्वे एका दिवशी 10 तासापेक्षा जास्त व एका आठवड्यामध्ये 54 तासापेक्षा अधिक काम करण्यास लावले जाणार नाहीत असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच सुट्टीच्या दिवशी करण्यात आलेल्या कामाबद्दल वाहनचालकास सामान्य वेतन दराच्या दुप्पट दराने वेतन अनुज्ञेय राहील असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच राजशिष्टाचार उपविभाग मार्फत राज्य अतिथी व अतिविशिष्ट मान्यवर यांचे परिवहन करण्यात येत असल्यामुळे त्यांच्या प्रवासामध्ये गैरसोय होवू नये या दृष्टीने वाहनचालकांची विहीत तासांपेक्षा अधिक काळ कर्तव्य कालावधी नियंत्रक यांच्या आदेशानुसार वाढवून देता येणार आहे .

वाहनचालकांना अतिकालिक भत्ता निश्चित करण्यासाठी सातवा वेतन आयोगातील (मुळ वेतन + महागाई भत्ता ) X 2 / महिन्याचे एकुण दिवस X 8 तास अशा सुत्राचा वापर करुन अतिकालिक भत्ता निश्चित करण्यात येतो .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करावेत..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment