GPF : नविन वर्षापासुन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व इतर तत्सम निधीच्या जमा रक्कमेवर 7.1% टक्के व्याज !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GPF intrest rate paripatrak ] : जुनी पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे . अशा योजनांवर केंद्र सरकारकडून विशिष्ट व्याजाची रक्कम दिली जाते .

सदर व्याज हे वर्षातुन तीन वेळा ( तीमाही )  सुधारित करण्यात येते . या संदर्भात अर्थ मंत्रालयांकडून दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी जमा रक्कमेवर तसेच तत्सम जमा रकमेवर दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन सुधारित व्याजदर अदा करण्यास परवानगी देण्यात आली आहे .

यानुसार दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन ते दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत भविष्य निर्वाह निधी मधील जमा रकमेवर तसेच तत्सम निधीच्या जमा झालेल्या रकमेवर 7.1 टक्के व्याजदराने व्याजदर लागु राहणार आहेत .

सन 2022-23 मध्ये भविष्य निर्वाह निधीच्या जमा रक्कमेवर 8.15 टक्के सर्वाधिक व्याजदर देण्यात आला होता .तर मागील वर्षात देखिल भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर हे 7.10 टक्केच होता .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment