राज्य शासकीय कार्यालयांसाठी कामकाज वेळा संदर्भातील महत्वपुर्ण GR ; पाहा सविस्तर ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ govt. office working time shasan nirnay ] : राज्य शासकीय कार्यालयांसाठी कामकाज वेळा संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार , राज्य शासकीय कार्यालयांसाठी दि.19.02.2020 पासुन 05 दिवसांचा आठवडा करण्यात आलेला आहे . तर राज्यातील सर्व कार्यालयांच्या कामकाजाची वेळा ह्या 45 मिनिटांनी वाढविण्यात आलेले आहेत , यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 मिनिट अशी कामकाजाची वेळा असणार आहेत .

शिपाई करीता वेळा : शिपाईच्या कामकाजाच्या वेळा ह्या सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 अशी असणार आहे .सकाळी स्वच्छता तर सायंकाळी कार्यालयातील कामकाज पुर्ण झाल्याच्या नंतर दप्तर बंद करण्यासाठी शिपाईच्या कामकाजाच्या वेळामध्ये वाढ करण्यात आलेली आहे .

सदर शासन निर्णय हा राज्यातील शासकीय महाविद्यालये , तंत्रनिकेतने , पोलिस दल , अग्निशमन दल ,शाळा , सफाई कर्मचारी इ. सेवांकरीता सदर 05 दिवसांचा आठवडा लागु राहणार नाहीत . याबाबतची यादी सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे .

सदर कामकाज वेळा संदर्भातील सविस्तर निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment