कर्मचाऱ्यांचे थकित देयके अदा करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.25.09.2024

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिाधी [ govt. employee thakit deyake mudatvadh paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे थकित देयके शालार्थ प्रणालीमध्ये थकीत दयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सन 2024-25 या आर्थिक वर्षामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याकरीता दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती . तर सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यांना ..

शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही . तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्या कारणांने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळणेबाबत शिक्षकेत्तर कर्मचारी , शिक्षक व मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर काही वेतन पथक ( माध्यमिक ) कार्यालयांकडूनही शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे . सदरची वस्तुस्थितीचा विचार करता डीडीओ -1 ( मुख्याध्यापक ) स्तरावरुन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .

त्यानंतर सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहे . तसेच थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टॅब / सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी श्री.पवन जोशी प्रोजेक्ट लिड शालार्थ सिस्टीम , मुंबई यांना सुचित करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment