Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Govt. Employee RMA increase nirnay ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्र सणाच्या अगोदरच मोठी गुड न्यूज समोर आली आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध वेतन / भत्ते  यामध्ये घरभाडे भत्ता , महागाई भत्ता , वाहन भत्ता , तसेच रोड मायलेज भत्ता  ,प्रोत्साहन भत्ता अशा प्रकारचे विविध भत्ते अदा केले जातात .

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार  (7th pay commission ) देण्यात येणारा रोड मायलेज भत्ता सुधारित करणे संदर्भात महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे . सदरचा भत्ता हा महागाई भत्त्याच्या प्रमाणात वाढ होत असते , केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाला असल्याने , सदर रोड मायलेज भत्तामधील वाढ करण्याची बाब प्रस्तावित होती . अखेर सदर भत्त्यामधील वाढ करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे .

रोड मायलेज भत्ता (RMA) हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वाहतूक तसेच ते वास्तव्यास असलेल्या , शहरानुसार अदा केला जातो . यामुळे जे कर्मचारी सदर भत्ताकरिता प्राप्त असतील , अशांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे . केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाप्रमाणे सदरचा भत्ता अदा  केला जातो . तसेच सदरच्या निर्णयानुसार केंद्रीय गृह  ( लष्कर) विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता देखिल सुधारित रोड मायलेज भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली असता , कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या वेगवेगळ्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे यामध्ये हॉटेल अलाउन्स , ड्रेस अलाउन्स , चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स , कन्व्हेन्स अलाउन्स, लोकेशन अलाउन्स अशा वेगवेगळ्या भत्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे .

सदर रोड मायलेज अलाउन्सच्या भत्त्याची वाढ नवरात्र सणाच्या अगोदरच करण्यात आल्याने ,  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *