Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Govt Employee New Pension Give Rules ] : सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागु करण्यात आलेला नव्या नियमांचे पालन करावे , लागणार आहे . अन्यथा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळणार नाही .
शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लागु करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळविण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवाकालावधीमध्ये वर्तवणूक पाहिली जाणार आहे . जर कर्मचाऱ्यांने सेवाकालावधीमध्ये गैरवर्तवणूक केल्यास अशा कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही .
तसेच कर्मचाऱ्यांवर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास ( सेवा कालावधी तसेच सेवानिवृत्ती नंतर पेन्शन घेत असताना ) त्यांची पेन्शन बंद करण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत . हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेले असून , राज्य कर्मचाऱ्यांना देखिल लागु करण्यात येणार आहेत . केंद्र सरकारच्या केंद्रीय सिविल सर्विसेस ( पेन्शन ) सन 2021 मध्ये सदर तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .
सदर सेवानियम नुसार नोकरी कालावधी मध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचाऱ्यांवर झालेली असल्यास , पेन्शन प्राप्तीकरीता सदर माहिती द्यावी लागणार आहे . तसेच सेवानिवृत्ती नंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास देखिल हे नियम लागु होणार आहेत .
तसेच जर एखादे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन , सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ घेत असल्यास आणि त्यानंतर सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास , त्यांच्याकडून पुर्वीपासून पेन्शन व इतर आर्थिक लाभाची वसूली करण्यात येणार आहे .तसेच सेवानिवृत्तीनंतर देखिल पेन्शन धारक हा सरकारच्या बांधिल आहे , त्याने केलेल्या सेवाकालावधीकरीता पेन्शन दिली जात असते , त्यामुळे पेन्शन घेत असताना देखिल सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्तवणूक करणे आवश्यक असेल .
थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहीजे , आरोप झालेले असल्यास त्यातुन त्याची निर्दोष सुटका झालेली असणे आवश्यक असेल , गंभीर गुन्हा असल्यास सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.