लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृतत पेन्शन धारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर आपल्यासाठी आत्ताची मोठी नविन अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे बऱ्याच दिवसांपासून सरकारी / पेन्शनधारकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे .
केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून नुकतेच जाहीर केलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार , माहे जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण चार टक्के वाढ लागु करण्यात येणार आहे . ही वाढ केंद्रीय सरकारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2023 पासून डी.ए फरकासह लागु करण्यात येणार आहे . या संदर्भात अधिकृत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून अधिकृत्त कार्यालय ज्ञापन पुढील महिन्यापर्यंत निर्गमित केला जाईल .
केंद्रीय स्तरावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी वाढ लागु करणेबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत , यामुळे देशातील सुमारे 50 लाख पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पगारवाढीचा मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .किमान मुळ वेतन ( Basic Payment ) रुपये 18,000/- रुपये वरुन रुपये 26,000/- पार होणार आहे . पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने , या अनुषंगाने नविन वेतन आयोग समितीचे गठण नविन वर्षांमध्ये करण्यात येईल .
फिटमेंट फॅक्टर हे 2.57 पट वरुन 3.68 पट करण्याची मागणी केंद्रीय कामगार युनियन कडून करण्यात येत असल्याने , पगारांमध्ये मुळ वेतनासह इतर देय असणाऱ्या भत्त्यांमध्ये देखिल मोठी वाढ केली जाईल . हा नविन वेतन आयोग ( आठवा वेतन आयोग ) सन 2026 पर्यंत लागु करण्यात येईल , परंतु आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत नविन वेतन आयोग समितीचे गठण 2024 मध्ये करण्यात येणार आहे , अशी माहिती समोर येत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !