Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ govt. employee new pay commission update news ] : राज्य कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणे संदर्भात मोदी सरकारकडून हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे . यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लवकरच लागु होणार आहे .
फिटमेंट फॅक्टर मध्ये 3 पट ते 3.68 पट पर्यंत होणार वाढ : केंद्रीय कर्मचारी युनियन कडून नविन वेतन आयोगांमध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , परंतु सदर मागणीवर केंद्र सरकारकडून 3 पट ते 3.68 पट पर्यंत फिटमेंट वाढीवर विचार करेल . 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 26,000/- रुपये असे ठरेल .
तर हेच प्रमाण महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना लागु केल्यास , किमान मुळ वेतन हे 21,000/- रुपये इतके निश्चित होईल .म्हणजेच फिटमेंट फॅक्टर मधील वाढ ही किमान मुळ वेतनातील वाढ निर्देशित करते . यामुळे इतर भत्यांमध्ये देखिल वाढ होईल , पंरतु महागाई भत्ताचे दर परत शुन्य टक्के होईल .
नविन वेतन आयोगांमध्ये घरभाडे भत्ता , वाहन भत्ता तसेच इतर देय भत्ते हे सुधारित वेतन आयोगांमुळे वाढतील . तर डी.ए चे दर पुन्हा शुन्यापासून सुरुवात होईल . यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ होईल .
नविन वेतन आयोग कधी स्थापन होणार : लोकसभा निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून नविन वेतन आयोगास नकारात्मक भुमिका घेण्यात आली होती , परंतु निवडणूकीच्या निकालानंतर मोदी सरकारने थोडीशी नरमाईची भुमिका घेण्यात आली आहे , कारण यंदा भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आला नाही . यांमध्ये कर्मचाऱ्यांचा रोष देखिल कारणीभूत ठरला आहे .
लोकसभा निवडणुकीपुर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन , नविन वेतन आयोग अशा प्रमुख मागणींसाठी दिल्ली येथे महाआंदोलन केले होते , परंतु यावर कोणताही निर्णय न झाल्याने , कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी कायम दिसून आली . तर आता देशातील काही प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या आनुषंगाने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नविन वेतन आयोग स्थापन करण्याची शक्यता मिडीया रिपोर्टनुसार वर्तविण्यात येत आहे . यानुसार पुढील तीन महिन्यात नविन वेतन आयोग स्थापन केला जाण्याची शक्यता आहे .