लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना आता नविन वेतन आयोगाची चाहुल लागलेली आहे . सन 2016 पासून केंद्र व महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन ( सुधारित वेतनश्रेणी) लागु करण्यात आलेला आहे . आता सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील नविन वेतन आयोगाची चाहुल लागली आहे .
दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगांमध्ये सुधारणा करण्यात येत असते , यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सन 2026 मध्ये आठवा / नविन वेतन आयोग लागु करणे अपेक्षित आहे . यासाठी पुर्वकामकाज म्हणून आठवा वेतन आयोगाची स्थापना केंद्र सरकारकडून करण्यात येत असते . नविन वेतन आयोग समितीची स्थापना पुढील वर्षी करण्यात येईल .
2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने , केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी नविन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येईल .सध्याच्या महागाई व इतर गोष्टींचा विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग हा 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनाचा लाभ मिळेल .
सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार 2.57 पटीने फिटमेंट फॅक्टर लागु करण्यात आलेला होता .आता कामगार युनियनच्या मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर मध्ये तब्बल 1.11 पॉईंची वाढ करण्यात येणार असल्याने , किमान मुळ वेतनांमध्ये मोठी वाढ होईल .
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतनांमध्ये आठ हजार रुपयांची वाढ होणार आहे , म्हणजेच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये आहे यांमध्ये 8 हजार रुपयांची वाढ होईल , म्हणजेच किमान मुळ वेतन हे 26,0000/- रुपये होईल . तर केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु केल्यास , किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये वरुन 21,100/- वर जाईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल , तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !