Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Govt. Employee DA Update News ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहेत . या संदर्भात सरकारकडून लकवरच अधिकृत्त निर्णय घेतला जाणार आहे .

महागाई भत्तामध्ये ( DA )  05 टक्यांची वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूका अनुषंगाने महागाई भत्तांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 46 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ मिळतो , आता यांमध्ये आणखीण 5 टक्क्यांची वाढ लागु करण्यात येणार आहे , ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 51 टक्के इतका होणार आहे .

पुढील महिन्यांत दि.16 एप्रिल रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने , निवडणुकापुर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट देण्यासाठी महागाई भत्तांमध्ये वाढ लागु करण्यात येणार आहेत . या संदर्भात अधिकृत्त निर्णय आचासंहिता लागु होण्यापुर्वीच घेण्यात येईल . आचारसंहिता पुढील आठवड्यांपासून लागु होण्याची शक्यता आहे . यामुळे आचारसंहिता पुर्वीच डी.ए वाढीचे निर्णय घेण्यात येईल .

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून डी.ए वाढीबाबत अधिकृत्त कार्यालयीन ज्ञापन निर्गमित झाल्यानंतर लगेचच राज्य शासनांकडून डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात येईल .

डी.ए 50 टक्के पार झाल्याने इतर भत्यांमध्ये होणार वाढ : महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , सातव्या वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता मध्ये देखिल वाढ होणार आहे . घरभाडे भत्ता सध्या लागु असणाऱ्या श्रेणीमध्ये वाढ होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *