लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची महत्वपुर्ण , आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे महागाई भत्तांमध्ये माहे जुलै महिन्यांच्या वेतन देयकासोबत वाढीव 3 डी.ए लागु करण्यात येणार आहे . या बाबत आत्ताची मोठी दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे , सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर झाल्यानंतर , डी.ए मध्ये माहे जुलै 2023 पासून आणखीण चार टक्के डी.ए वाढ अपेक्षित आहे .शिवाय एआयसीपीआय -आयडब्ल्यु ( AICPI -IW ) मार्फत निर्गमित सुधारित आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीचे दर हे 3 टक्के पेक्षा अधिक आहे .
केंद्र सरकारच्या AICPA – IW च्या आकडेवारी ही दिनांक 31 जुलै 2023 राजी जाहीर करण्यात आली आहे यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये सुधारणा करण्यात येत असते , सदर आकडेवारीनुसार , महागाई ही समतोल राखण्यासाठी डी. ए मध्ये चार टक्के नव्हे तर तीनच टक्के वाढ लागु करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे .
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये 3.23 % टक्के वाढ अपेक्षित आहे , परंतु तीन टक्के वरील दशांश अंकाचा विचार केला असता , महागाई भत्ता हा 3 टक्केच निश्चित करण्यात येईल .सदर डी.ए वाढी संदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून प्रस्ताव तयार करण्यात येणार असून , सदर प्रस्ताव केंद्र पंतप्रधान यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे .
यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता (DA) हा 45% होणार आहे .या महागाई भत्ता वाढीचा फायदा केंद्र शासन सेवेतील सातव्या वेतन आयोगानुसार वेतन धारण करणाऱ्या तसेच पेन्शनधारकांना फायदा होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !