Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Fitment Factor , DA , Gross Salary New Upadate News ] : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर , आपणासाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या नविन वेतन आयोग 2026 पर्यंत लागु करण्यात येणार असून , नविन वेतन आयोगाची स्थापना आगामी नविन वर्षात होण्याची मोठी शक्यता वर्तविली जात आहे .

फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हा 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे लागु करण्यात आलेला आहे , तर आता नविन वेतन आयोग ( 8 th Pay Commission ) 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे लागु करणेबाबत , कामगार युनियन मार्फत वेळोवेळी मागणी करण्यात येत आहेत .फिटमेंट फॅक्टर मधील वाढीनुसार कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन निश्चित करण्यात येत असतात .

नविन वेतन आयोगानुसारची किमान मुळ वेतनातील वाढ : जर कामगार युनियनच्या मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ लागु केल्यास , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्य किमान मुळ वेतन 18,000/- रुपये वरुन वाढुन 26,000/- रुपये इतके होईल .तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन वाढून 21,000/- इतका निश्चित करण्यात येईल .

आठवा वेतन आयोगाची स्थापना : केंद्र सरकारमार्फत कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग ( 8 th Pay Commission ) लागु करणेबाबत , वेतन आयोग समितीची स्थापना पुढील नविन वर्षांच्या सुरुवातील करण्यात येणार असल्याची मोठी वृत्त समोर येत आहेत .वेतन आयोग नियोजित निश्चिती पुर्वी दोन वर्ष अगोदर वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येत असतात . सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग नियोजित असल्याने , पुढील वर्षी वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येईल .

नविन वेतन आयोग लागु केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्ता , प्रोत्साहन भत्ता , वाहन भत्ता इ. भत्यांमध्ये वाढ करण्यात येईल . तर महागाई भत्तामधील वाढ परत एकदा शुन्य टक्यांपासून सुरुवात होईल .आगामी लोकसभेच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारकडून वेतन आयोग समितीची स्थापना आचारसंहिता पुर्वीच करण्याची मोठी शक्यता वर्तविली जात आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *