Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [government work Sandesh apps uses nirnay ] : आता शासकीय कामकाजांमध्ये संदेस या ॲप्सचा वापर करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 26 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र व राज्य शासन , शासकीय कार्यालये व स्थानिक संस्थामध्ये होणाऱ्या संदेश व संप्रेषणांची देवाणघेवाण करीता संदेश या ॲप्सचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यांमध्ये ऑडिओ / व्हिडिओ क्लिप व नस्ती इ. माहिती देखिल सुरक्षितपणे देवाणघेवाण होत असते . सदर संदेश ॲप हे डिजिटल इंडिया कार्यक्रम अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम आहे .
सदर ॲप्स शासन ते शासन व शासन ते नागरिक संप्रेषण / संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्त्रोत आधारित , सुरक्षित व स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग , प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे . संदेस हे ॲप्स व्हॉट्सॲप प्रमाणे कार्य करते .तर सदर ॲप्स हे भारतीय असल्याने , गोपनिय व सुरक्षितेची हमी असणार आहे .
संदेश ॲप हे मेसेजिंग प्लॅटफॉमर्सची सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देते . सदर ॲपची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत .
- संदेश सुरक्षित पाठविणे व प्राप्त करणे , सुरक्षित साठवण व वितरीत झालेला डाटा सुरक्षित ठेवणे .
- सरकारी / सरकारी कार्यालये यांच्या गरजानुसार अनुकुललित करण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देते .
- गट तयार करणे , शासकीय वापर कर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय , शासनासाठी योग्य जिमोजी .
- डेस्कटॉप / लॅपटॉपसाठी संदेश वेब आवृत्तीची उपलब्धता , पोर्टलवरुन भूमिका आधारित व्यवस्थापन व देखरेख .असे अनेक नाविन्यपुर्ण फिचर्स उपलब्ध आहेत .
💁💁हे पण वाचा : इयत्ता 12 वी पात्रता धारकांसाठी 2,000+ जागेवर महाभरती ; Apply Now !
सदरचे ॲप्स हे NIC द्वारे विकसित करण्यात आले असून , सदर ॲप्सचा वापर हे केंद्र शासनातील सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच विविध राज्य शासनांमधील 200 पेक्षा अधिक सरकारी संस्था यांच्याकडून तसेच 350 पेक्षा अधिक ई – गव्हर्नन्स ॲप्लिकेशनमध्ये संदेश , सुचना व ओटीपी पाठविण्यासाठी केला जात आहे .
सदरच्या ॲपचे विविधांगी कार्यत त्याचबरोबर उपयोग विचारात घेता , महाराष्ट्र राज्य सरकार देखिल शसकीय कामकाजात राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र द्वारे विकसित करण्यात आलेले संदेस ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधिनस्थ सरकारी कार्यालयांना सुचना देण्यात येत आहेत .या संदर्भातील सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.