Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Women Employee Pension Good Update From Central Government ] : केंद्र सरकारच्या अधिनस्थ कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक बदल करण्यात आलेला आहे . सदर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे .
महिला कर्मचाऱ्यांना आता यापुढे वारसदार ठरविण्याच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून काल दिनांक 02.01.2024 वार मंगळवार रोजी महत्वाचा बदल लागु करण्यात आल्याने , DOPPW ( निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण ) विभागांने सदर वारदारांच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे . सदर निर्णयांमुळे आता केद्र सरकारच्या अधिनस्थ महिला कर्मचाऱ्यांना आपल्या पतीऐवजी वारसदार म्हणून मुलाचे / मुलींचे नाव देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे .
यापुर्वी वारसदार म्हणून थेट पतिऐवजी मुलाचे / मुलींचे नाव देण्याची परवानगी नव्हती . यामुळे सदर निर्णयांमुळे पेन्शनमध्ये मोठा बदल झालेला आहे . पतीसोबत सुरु असणाऱ्या वादांमुळे महिला कर्मचारी पेन्शन व पेन्शन आदी लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्या पतीऐवजी आपल्या स्वत: च्या मुलामुलींची नावे वारसदार म्हणून निश्चित करु शकणार आहेत .
या संदर्भातील अधिकृत्त माहिती DOPPW चे सचिव व्ही . श्रीनिवास यांनी मंगळवारी दिली आहे . मृत शासकीय कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंबात पती / पत्नी असल्यास त्या कर्मचाऱ्याच्या पश्चात सर्वप्रथम पतीला / पत्नीला कुटुंब निवृत्तीवेतन देण्यात येते . सध्याच्या नियमांनुसार महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर पतीला कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळते .तर पतीच्या मृत्युनंतरच मुला /मुलींना कौटंबिक पेन्शनचा लाभ मिळतो .
आता सुधारित नियमांनुसार महिला कर्मचाऱ्यांना मृत्युनंतर कौटुंबिक पेन्शनचा लाभ प्राप्तीसाठी मुला / मुलींची निवड करु शकणार आहेत . या सुधारित नियमांमुळे केंद्र सरकार अधिनस्थ कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.