Spread the love

Live Marathipepar संगिता पवार [ Postal Life Insurance ] : सरकारी कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी त्याचबरोबर नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकांसाठी भारतीय डाकविभागाने खास गुंतवणुक योजना काढली आहे . यांमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांना विशिष्ट वयांनंतर गुंतवणुक रक्कम इतर एलआयसी पॉलिसी पेक्षा अधिक रक्कम प्राप्त होते , या गुंतवणुक योजना बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहुयात ..

पोस्टल लाईफ पॉलिसी अशा या गुंतवणुक योजनेचे नाव असून , ही योजना इतर विमा पॉलिसी पेक्षा अधिक व्याज देते , व गुंतवणुक रक्कमेवर तिप्पटीने लाभ प्रदान करते . प्रामुख्याने या योजनेचा लाभ केवळ सरकारी – निमाशासकीय कर्मचारी तसेच सर्व शैक्षणिक संस्था , डॉक्टर , इंजिनिअर , सहकारी बँका / संस्था मधील कर्मचारी , तसेच व्यावसायिक पदवी प्राप्त आर्किटेक्चर , वकिल , चार्टर्ड अकांऊन्ट या योजनेचा लाभ घेवू शकतात .

वयोमर्यादा : या योजनेचा लाभ घेण्यासाठी पॉलिसी धारकाचे किमान वय हे 19 वर्षे तर कमाल वय हे 55 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . या योजनेमध्ये वयानुसार प्रिमियम पेड करावा लागतो , कमी वय असेल तर कमी प्रिमियम पडतो , तर जास्त वय असल्यास प्रिमियम हप्ताची रक्कम वाढते .

वयमुदतपॉलिसी रक्कमपॉलिसी हप्तामुदत अंती मिळणारी एकुण रक्कम
213710 लाख203829,24,000
223610 लाख203828,72,000
233510 लाख203828,20,000
243410 लाख224727,68,000
253310 लाख224726,64,000
263210 लाख245626,64,000
273110 लाख245626,12,000
283010 लाख266525,60,000
292910 लाख266525,08,000
302810 लाख287424,56,000
312710 लाख308324,04,000
322610 लाख329223,52,000
332510 लाख350123,00,000
342410 लाख371022,48,000
352310 लाख371021,96,000
362210 लाख391921,44,000
372110 लाख412820,92,000
382010 लाख433720,40,000
391910 लाख454619,88,000
401810 लाख475519,36,000
411710 लाख517318,84,000
421610 लाख559118,32,000
431510 लाख600917,80,000
441410 लाख642717,28,000
451310 लाख684516,76,000
461210 लाख747216,24,000
471110 लाख830815,72,000
481010 लाख914415,20,000
49910 लाख1018914,68,000
50810 लाख1144315,16,000

लाभ कसा घ्याल : या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या पोस्ट / डाक कार्यालयाशी भेट देवून या पोस्टल लाईफ पॉलिसी काढू शकता , ही योजना केंद्र सरकारची असल्याने , अत्यंत सुरक्षित योजना आहे , शिवाय एलआयसी पेक्षा अधिक रिटर्न देते , यामुळे कर्मचारी वर्गांनी या योजनेचा लाभ घेणे फायदेशिर ठरणार आहे .

आवश्यक कागतपत्रे : या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आधारकार्ड , पॅनकार्ड , नियुक्तीचे ओळखपत्र / नियुक्ती पत्र / व्यावसायिक डिग्री प्रमाणपत्र , पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक असणार आहेत .

या योजनचे खास वैशिष्ट्ये : या विमा योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ऑनलाईन पद्धतीने , डेबिट कार्ड , PAYTM , फोन पे द्वारे प्रिमियम भरु शकता . या योजनामध्ये आपल्याला कर्ज तसेच गहाणखत त्याचबरोबर नामनिर्देशन अशा प्रकारच्या सुविधा देखिल उपलब्ध होतात . तर मुदत अंती मिळणारी रक्कम ही आयकर नियम 80 सी अंतर्गत प्राप्तिकर सवलतीचा लाभ प्राप्त होतो .तर एक वर्षाकरीताचे आगाऊ प्रिमियम हप्ते भरल्यानंतर आपल्याला विमा प्रिमियम मध्ये 2 टक्के सुट मिळते तर सहा महिने कालावधीमधील आगाऊ प्रिमियम हप्ते भरल्यानंतर 1 टक्के सुट मिळते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *