Spread the love

लाईव्ह मराठी पेपर ,बालाजी पवार : भारतीय डाक विभागांकडून खास करुन सरकारी -निमसरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक योजना सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेच्या माध्यमातुन गुंतवणुक केल्यास गुंतवणुकदारांना मुदतीनंतर तब्बल 50 लाख रुपयांचा लाभ प्राप्त होणार आहे . नेमकी योजना कोणती आहे , या साठी आवश्यक पात्रता व आवश्यक असणारे कागतपत्रे याबाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .

पोस्टल लाईफ विमा योजना ( Postal Life Insurance Scheme ) : ही योजना डाक विभागांकडून खास सरकारी निमसरकारी व इतर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी तसेच  डॉक्टर , वकिल यांच्यासाठी राबविण्यात येत आहेत .या योजनेचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत . i) PLI   ii) RPLI असे दोन प्रकार आहेत . या दोन्ही प्रकारांमध्ये सारखे फायदे मिळतात . या योजनांचे प्रमुख खास वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेचे प्रिमियम रक्कम इतर विमा योजनाच्या रक्कमांपेक्षा खुपच कमी आहे .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे – या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे शासकीय कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी त्याचबरोबर कंत्राटी कर्मचारी , तसेच केंद्र व राज्य सरकारच्या महामंडळामधील सर्व कर्मचारी त्याचबरोबर सर्व शैक्षणिक संस्थामधील शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी , बँक कर्मचारी , सार्वजनिक क्षेत्रांमध्ये कार्यरत कर्मचारी , डॉक्टर , इंजिनिअर , वकील , आर्किटेक्टर , इत्यादी कर्मचारी या योजनांचा लाभ घेवू शकतील .

वयांनुसार प्रिमियम रक्कम – या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणुकीदाचे किमान वय हे 19 वर्षे तर कमाल वय 55 वर्षे असणे असणे आवश्यक आहे .वयांनुसार प्रिमियम रक्कम भरावी लागेल , या विमा पॉलिसीची मुदत वयाच्या 58 व्या वर्षी असणार आहे .58 व्या वर्षानंतर विमाधारकांसह पॉलिसी रक्कम व मुदतीअंती येणारी एकुण रक्कम देण्यात येते .

वयांनुसार भरावी लागणारी प्रिमियम रक्कम चार्ट पुढीलप्रमाणे पाहु शकता –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क करुन या योजनेचा लाभ घेवू शकता , या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड , पॅनकार्ड , आयकार्ड / नियुक्ती पत्र , पासपोर्ट साईज फोटो इ.आवश्यक आहेत .

शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती , व इतर बातम्यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *