विद्यमान सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee various demand ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या ह्या अद्याप पर्यंत प्रलंबितच आहेत . यावर कोणत्याही सरकारकडून , निर्णय घेतला जात नाही . अशा कोणत्या मागण्या आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

जुनी पेन्शन ( Old Pension ) : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची मागणी बऱ्याच दिवसांपासुन केली जात आहे . परंतु सदर मागणीवर अद्याप पर्यंत तोडगा काढण्यात आलेला नाही . कारण जुनी पेन्शन सारखी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे .

परंतु या दोन्ही नविन पेन्शन प्रणाली अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन ( Pension ) मिळत नसल्याने , कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनाच पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्याची मागणी होत आहे .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे ( Retirement age 60 Years ) : कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची मागणी पुन्हा एकदा चर्चेत येत आहे . कारण देशांत केंद्र सरकारसह इतर 25 राज्य सरकारने निवृत्तीचे वय हे 60 वर्षे केले आहेत . या धर्तीवरच राज्यातील  कर्मचारी निवृत्तीचे वय 60 वर्षे ( Retirement age 60 Years ) करण्याची मागणी होत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment