Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Three Benefit ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांना एक नव्हे तर तीन मोठे फायदे जाहीर होणार आहेत . या संदर्भातील सविस्तर मोठी आनंदाची अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

डी.ए मधील वाढ : माहे एप्रिल – मे महिन्यांत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत . या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पुर्ण लक्ष असणार आहेत . निवडणुकापुर्वी सरकारी कर्मचारी तसेच जनतेस जेवढे आर्थिक / सामाजिक लाभ देता येतील , तेवढे दिले जाणार आहेत . जेणेकरुन निवडणुकांमध्ये विद्यमान सत्तेतील पक्षांना अधिक लाभ होईल .

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून 46 टक्के दराने महागाई भत्ता लागु आहे . आता यांमध्ये आणखीव 5 टक्यांची वाढ केंद्र सरकारकडून माहे जानेवारी 2024 लागु करण्यात येणार असल्याची मोठी खुशखबर समोर येत आहेत . केंद्र सरकारकडून डी.ए वाढीबाबतचा प्रस्तावास मंजुरी प्राप्त झालेली असून फक्त जाहीर करणे बाकी आहेत . येत्या अर्थसंकल्पांमध्ये याबाबत मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहेत .कारण कामगार विभागांकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला असल्याने , डी.ए मधील वाढीबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे .

HRA मध्ये वाढ : महागाई भत्ता मध्ये 50 टक्के पेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तामध्ये वाढ करणे नियोजित असल्याने , घरभाडे भत्तामध्ये 3 टक्क्यांची वाढ करण्यात येईल .सध्या घरभाडे भत्ताचे दर X , Y , Z  श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 27 टक्के , 18 टक्के , 9  टक्के दराने लागु आहेत . आता यांमध्ये डी.ए चे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , श्रेणीनुसार अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के , 10 टक्के अशी वाढ होणार आहे .

प्रवास भत्ता ( TA ) मध्ये होणार वाढ : प्रवास भत्तामधील वाढ ही डी.ए वाढीवर अवलंबून आहे . प्रवास भत्ता हा वेतनश्रेणीवर अवलंबून आहे . उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अधिक प्रवास भत्ता 1800/- रुपये तर त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीतील मधील अधिकाऱ्यांना 3600 प्रवास भत्ता मिळतो . आता पुन्हा एकदा यांमध्ये 300/- रुपये ते 800/- रुपयापर्यंत वाढ होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *