सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भातील नियमांमध्ये बदल ; सरकारकडून नियमावली जारी !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee Retirement rules change] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भातील नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे , या संदर्भात सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे .

व्हेरिफिकेशन प्रक्रिया : सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या पाच वर्षांपूर्वीच पिरीयॉडिक व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आवश्यक असणार आहे , यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवा संदर्भातील नोंदी यामध्ये अद्यावत होणार आहेत . जेणेकरून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर समस्या येणार नाहीत .

सदरची वेरिफिकेशन प्रक्रिया कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत केली जाणार आहे , त्यानंतर कर्मचाऱ्यास एक प्रमाणपत्र दिले जाईल . ज्या प्रमाणपत्राच्या आधारे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुविधा प्राप्त करण्यास सुलभ होणार आहे .

याशिवाय कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या पाच वर्षांपूर्वी आपली पात्रता सेवा संदर्भातील अपडेट सादर करावी लागणार आहे . सदरची प्रक्रिया 31 जानेवारीपासून सुरू होणार असून, यामध्ये कर्मचाऱ्यास आपल्या सेवेचा तपशील पाच वर्षांपूर्वीच सादर करावी लागणार आहे .

वरील नियमावली ही 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे , जेणेकरून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन प्राप्त करिता विलंब होणार नाही . यासाठी सदर नियमावली सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment