Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee Retirement age increase] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये 60 वर्ष ऐवजी 62 वर्ष करणे बाबत , महत्वपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे . सदर प्रस्तावाचा फायदा केंद्र सरकारच्या अधिनस्त 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे .

केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून सदर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करणे , संदर्भाचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची , माहिती समोर येत आहे . सूत्राच्या प्राप्त माहितीनुसार , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये आणखीन 02 वर्ष वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे .

सदर मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची , माहिती समोर येत आहे . केंद्र सरकार विद्यमान कर्मचाऱ्यांचा अनुभव तसेच ज्ञानाचा उपयोग करून देशाच्या उन्नती मध्ये , वाढ करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे .

तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने विचार केला असता , केंद्र सरकारने नवीन युनिफाईड पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार दिले जाणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांची सेवा ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणात निवृत्तीचे वेतन ठरले जाणार असल्याने , कर्मचाऱ्यांकडून देखील सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत मोठी मागणी होत आहे.

दुसऱ्या बाजूने विविध सरकारी विभागातील बरेच पदे रिक्त असल्याने , सदर पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात येतो , परिणामी कामकाजामध्ये सुसूत्रता येत नाही . यामुळेच निवृत्तीचे वय वाढविण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत दिसून येत आहे .

सद्यस्थितीमध्ये केंद्र सरकार व इतर 25 राज्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे , तर महाराष्ट्र राज्यामध्ये वर्ग 4 कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *