जुनी पेन्शन योजना बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्वपुर्ण निकाल , वाचा सविस्तर माहिती !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजना हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे , सरकारी कर्मचाऱ्यांकडून सध्या देशपातळीवर जुनी पेन्शनची मागणी करताना दिसून येत आहे .परंतु जुनी पेन्शन योजना लागु करणे हा मुद्दा सरकारच्या हातात असल्याने , सरकारने याबाबत अधिकृत्त अधिसूचना काढल्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार नाही .

सन 2004 पासुन देशांमध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली , याबाबत सन 2004 नंतर सरकारी सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लागु व्हावी याकरीता न्यायालयांमध्ये धाव घेतली . जुनी पेन्शन योजना बाबत न्यायालयाने अनेक दिलासादायक निर्णय दिले आहेत . ज्या कर्मचाऱ्यांच्या परीक्षा ही राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यापुर्वीची होती अशा कर्मचाऱ्यांना परत एकदा जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जुनी पेन्शन योजनांचा लाभ प्राप्त झाला .

भारताच्या सर्वोच्च न्यायालयांमध्ये जुनी पेन्शन योजना बाबत दि.01.07.2015 रोजी केलेली अपील वर सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे कि , सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन प्राप्त करणे हा एक प्रकारचा अधिकार आहे . शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांने वयाच्या 58/ 60 वर्षांपर्यंत शासनांची सेवा केल्याने निवृत्तीनंतर पेन्शनवर दावा करण्याचे हक्कदार आहेत . यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विशेष नमुद केले होती कि , निवृत्तीनंतर पेन्शनची रक्कम ही 50 टक्के पेक्षा अधिक असू नयेत .

शिवाय निवृत्तीवेतनांमध्ये अपग्रेड  ( वाढ ) हे देखिल सेवानिवृत्त पेन्शन धारक कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे . हे पेन्शन देयके अदा करण्यासाठी सरकार वाढीव आर्थिक भार येईल असे कारण देवू शकत नाही असे नमुद करण्यात आले आहेत . असा निकाल दिला असला तरीदेखिल सरकारकडून पेन्शन बाबत उचित निर्णय घेतला जात नाहीये .

उलट निमलष्करी दल मधील जवानांना सैनिक वर्गातील नाहीत असे स्पष्ट करुन दिल्ली हायकोर्टाने जुनी पेन्शन बाबत दिलेला निर्णयास सुप्रिम कोर्टात स्थगित देण्यात आली . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी हक्काची पेन्शनवर सरकारकडून आडकाठी आणली जात आहे , याऊलट देशांमधील आमदार , खासदार , मंत्री यांच्या पेन्शनवर कोणत्याही प्रकारची स्थगिती आणली जात नाहीये .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment