Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सन 2024 मध्ये केंद्रीय लोकसभा व राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत , या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांना प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर मोठा लाभ प्राप्त होणार आहे .यांमध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन हा मुद्दा निवडणुकांमध्ये मोठा महत्वाचा ठरणार आहे . जुनी पेन्शन योजना याच मुद्द्यावर कर्नाटक , हिमाचल प्रदेश , पंजाब राज्यांमध्ये काँगेसने एकहाती यश मिळवून सत्ता स्थापन केले आहेत .

यामुळे महाराष्ट्र राज्यात देखिल हिमाचल प्रदेश , कर्नाटक , पंजाब प्रमाणे स्थिती निर्माण होईल , यासाठी आता सर्व पक्षीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा करत आहेत .काँगेसच्या आश्वासन / उद्देश प्रत्रिकेमध्येच जुनी पेन्शन चा उल्लेख केला जातो यामुळे इतर पक्षीय देखिल जुनी पेन्शन लागु करण्याचे आश्वासन देत आहेत . जुनी पेन्शन लागु होवू शकत नाही असे बोलणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखिल विधानपरिषदेच्या निवडणुकांदरम्यान स्पष्ट आश्वासित करत होते कि , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे .

परंतु आश्वासन हे फक्त निवडणुकांपुरतेच आहे का असा प्रश्न आता सरकारी कर्मचाऱ्यांना पडत असल्याने , निवडणुकांच्या अगोदरचे सत्तेत असणारे भारतीय जनता पार्टी जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे . गठीत समितीच्या दुसऱ्यांदा देण्यात आलेली मुदवाढ संपुष्टात आल्याने , आता जुनी पेन्शनवर राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय तुर्तास नाही घेतला तरी निवडणुकीच्या आधी जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ लागु करणेबाबचा निर्णय भाग पडणार आहे .

तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नविन वेतन आयोग लागु करण्यात येत असते ,परंतु या अगोदर नविन वेतन आयोग लागु करणेबाबत पुर्व अभ्यास करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना दोन वर्षे अगोदर करण्यात येत असते . यामुळे दर दहा वर्षांचा विचार केला असता , सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु करणे अपेक्षित आहे , याकरीता वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षे होण्याची दाट शक्यता आहे . जेणेकरुन विद्यमान सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देवून , आगामी निवडणुकांसाठी सहानुभुती मिळवतील ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *