Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee new service rules ] : नियम पदावर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थेट सेवानिवृत्तीचा नवा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे , यामुळे आता नियमित पदांवर ( स्थायी ) असुन देखिल लोकहितास्तवर थेट सेवानिवृत्ती दिली जाणार आहे . याबाबतचा सुधारित आदेश पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
सरकारी कर्मचारी म्हटले कि एकदा सरकारी नोकरी लागल्याच्या नंतर सेवानिवृत्तीनंतर कोणतेही टेन्शन नाही , अशी धारण आहे , परंतु आत केंद्र सरकारकडून नवा नियम अंमलात आणत आहेत , यांमध्ये केंद्र सराकरच्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमे , बँका , स्वायत्त संस्था व वैधानिक संस्था मधील कर्मचाऱ्यांच्या कामांचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तर पुनरावलोकन करुन सार्वजनिक हितास्तव कर्मचाऱ्यांना कामावर ठेवायचे कि , सदर कर्मचाऱ्यांस निवृत्ती द्यायचे हे सदर आदेशांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , याकरीता सरकारी कर्मचाऱ्यांची अधूनमधुन कामगिरीची वेळोवेळी चाचपणी करण्याचे निर्देश देणत आलेले आहेत . सदर कामगिरी अहवालांमध्ये सरकारी मार्गर्शक तत्वांचे पालन होत नसल्यास पेन्शन नियम , केंद्रीय नागरी नियम 48 मधील नियमांचे उलंघन होत असल्याचे नमुद करुन सदर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
कामाच्या परिमाणपणा , आर्थिक परिणामकारकता तसेच तत्परता राखण्याची पद्धत या आधारावर कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवयाचे मुल्यमापन करुनच सेवेत पुढे ठेवण्याचा नियम लागु करण्यात आला आहे .कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या कामाचे पुनरावलोकन करण्याबाबतच्या कालावधी संदर्भात केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या सन 2020 च्या आदेशांचे पालनकरण्याचे आदेशांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच अकार्यक्षम तसेच कामचुकारपणा करीत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील बदली दिली जाणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . या संदर्भात कार्मिक व प्रशिक्षण विभाग मार्फत सन 2020 च्या आदेशांमध्ये नियमावली जारी करण्यात आलेली आहे , सदर नियमावलीचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.