Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee new rules see detail ] : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा , हजेरी रजा नियम या संदर्भात नविन नियमावली जारी करण्यात आलेली आहे . सदर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

कार्यालयीन वेळा : कर्मचाऱ्यांनी आता यापुढे 15 मिनिटा पर्यंतच उशीर ग्राह्य धरण्यात येईल , त्यानंतर अर्धा दिवस रजा टाकण्यात येईल . कारण सतत उशिरा येण्याच्या कर्मचाऱ्यांच्या सवयी यामुळे बंद होणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तर नेहमी उशिरा येणाऱ्यांवर कारवाईची देखिल तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .

कर्मचाऱ्यांची हजेरी : यापुढे आता केंद्र सरकारच्या सर्व आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहेत , तर सदर नोंद ही डिजिटल पद्धतीने नोंदविण्यात येणार आहे .

रजा नियम : जर गैरहजर प्रसंगी संबंधित कार्यालय प्रमुखास कळविणे आवश्यक असेल , तर आपत्कालीन स्थितीमध्ये औपचारिक रजा करीता आवेदन सादर करणे बंधनकारक असणार आहेत , तर रजेच्या कारणांची नोंद ठेवणे आवश्यक असणार आहेत .

कर्मचाऱ्यांकरिता सुचना : वेळेचे पालन करणे , हजेरी नियमित नोंदविणे , रजेसाठी पुर्व परवानगी घेणे , शिस्तीचे पालन करणे . अशा महत्वपुर्ण सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत .

कार्यालयीन कामकाजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता वाढविणे , नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करणे , कार्यालयीन वातावरणांमध्ये सकारात्मक बदल करणे हे प्रमुख परिणाम सरकारला यातुन अपेक्षित आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *