Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee new pay commission update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करणे संदर्भात आत्ताच्या कडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग (new pay commission ) 2026 पासून लागू करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तयारी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे .
लोकसभा व राज्यसभेमध्ये वारंवार विरोधकाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत . यामुळे नवीन वेतन आयोग (new pay commission ) लागू करण्याच्या अनुषंगाने सरकार देखील कामाला लागले आहे . केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून या संदर्भात माहिती गोळा करण्याचे कामकाज केले जात आहेत .
दिनांक 01 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग (new pay commission ) म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू होणे नियोजित आहेत . त्या अनुषंगाने निदान सन 2025 मध्ये वेतन आयोग समिती गठीत होणे आवश्यक आहे . याकरिता केंद्रीय कामगार संघटनांकडून वेळोवेळी सरकारला निवेदन सादर केले जात आहेत .
येत्या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोगाची तरतूद : प्राप्त माहितीनुसार येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग (new pay commission ) लागू करणे संदर्भात आठवा वेतन आयोग समितीचे गठन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .
आठवा वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटनेस फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ मिळणार आहे . ज्यामुळे किमान मुळ वेतनातील वाढ ही 18,000/- रुपये वरून 26,000/- रुपये इतकी होणार आहे . ज्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.