Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee New Pay Commission News ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे नविन वर्षांमध्ये आठवा वेतन आयोगाची स्थापना करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहेत .
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग वेज सिस्टम नुसार देशांमध्ये किमान वेतनाचा नियम लागु करण्यात येणार आहे .यामुळे देशांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढी बरोबरच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन वाढ देखिल होणार आहे . भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार , देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वर्षांमध्ये सुधारित वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .
सुधारित वेतनश्रेणी : सरकारी कर्मचाऱ्यांचा डी.ए हा जुलै 2024 नंतर 50 टक्के पेक्षा अधिक होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय वेतन / भत्ते मध्ये मोठी वाढ होईल . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्येच वाढ होणे अपेक्षित आहे . तसेच सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग अपेक्षित असल्याने , नविन वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षी करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मुळ वेतनातील वाढ लागु करण्यात आलेली होती , आठव्या वेतन आयोगांमध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मुळ वेतन वाढ करण्याची कामगार युनियनची मागणी आहे .
3.68 फिटमेंट फॅक्टरनुसार मुळ वेतनातील वाढ पाहीली असता , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये वरुन 26,000/- इतके होईल तर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन 21,000/- रुपये इतका होईल .
किमान मुळ वेतनातील वाढीनंतर इतर देय वेतन / भत्ते मध्ये वाढ होईल , परंतु सदर देय वेतन / भत्यांचे प्रमाण बदलले . म्हणजेच महागाई भत्त्याचे दर परत शुन्य टक्के पासून सुरुवात होईल . सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन लागु झाल्याच्या नंतर , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखिल सुधारित पेन्शन प्रणाली ( आठवा वेतन आयागानुसार ) लागु करण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.