Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee new pay commission news ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित असणारी मागणी अखेर लवकरच पुर्ण होण्याचे संकेत समोर येत आहेत .

सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीमध्ये नविन वेतन आयोग लागु करण्याच्या अनुषंगाने लवकरच केंद्र सरकारकडुन नविन वेतन आयोगाची स्थापना करण्याची तयारीत दिसुन येत आहेत .केंद्र सरकारकडे कर्मचारी युनियन कडून सदर वेतन आयोग लागु करणेबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहेत .

सध्या देशांमध्ये निवडणुकांचे वातावरण सुरु आहेत , अशातच सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या बाजुने खेचण्यासाठी नविन वेतन आयोग लागु करण्याच्या तयारीत केंद्र सरकार दिसून येत आहेत . सन 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु होणे निश्चित असले तरी , नविन वेतन आयोग ( 8th Pay commission ) समितीचे गठण सध्यस्थितीमध्ये होणे आवश्यक आहे .

सध्याचा सातवा वेतन लागु करताना सन 2014 मध्ये सातवा वेतन आयोग समितीचे गठण तर सन 2016 पासुन सातवा वेतन आयोग लागु करण्यात आलेला आहे . तर मागील सर्वच वेतन आयोग पाहीले असता , 10 वर्षांच्या फरकाने लागु करण्यात आलेले आहेत , तर त्या अगोदर 02 वर्षे वेतन आयोग समितीचे गठण केले गेले आहेत .

आत्तापर्यंत लागु करण्यात आलेले वेतन आयोगाचा सविस्तर तपशिल , पगारवाढ याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे ..

वेतन आयोगसनपगारातील वाढ
पहिला194740 टक्के
दुसरा195950 टक्के
तिसरा197325 टक्के
चौथा198640 टक्के
पाचवा199635 टक्के
सहावा200640 टक्के
सातवा201414 टक्के

नविन वेतन आयोग सन 2026 मध्ये लागु होणे अपेक्षित आहे , त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत . कारण निवडणुकींमध्ये कर्मचाऱ्यांचा कौल बदलु नयेत , याकरीता नविन वेतन आयोग समितीचे लवकरच गठण करण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *