लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : DA Hike, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत. पुढील वर्षांमध्ये सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली जाईल अशी शक्यता दिसत आहे. तसेच केंद्रातील नोकरदारांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
DA Hike News in Marathi : केंद्र सरकारने आता निवडणुकीची तयारी सुरू केली आहे असे संकेत मिळत आहे. पुढील वर्षी आता जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार मोठी घोषणा करेल. तुम्ही जर शासकीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबांमधील कोणतीही व्यक्ती केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागांमध्ये कार्यरत असेल तर ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ठरणार आहे.
सातव्या वेतन आयोगा नंतर शासकीय कर्मचाऱ्यांकरिता काही आयोग स्थापन करणार नाही. हे आतापर्यंत आपण ऐकले. परंतु आता केंद्र सरकारच्या मूड बदलला आहे. कारण पुढे तोंडावर निवडणूक आले आहेत. अशावेळी सरकार किमान पगारात वाढ करण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे आता सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची व आनंदाची बातमी देईल अशी शक्यता दिसत आहे.
किमान पगारात मोठी वाढ : आठव्या वेतन आयोगाची फाईल सुद्धा तयार झाल्याचे दावा आपल्या कानावर आला आहे. सूत्रांच्या अहवालानुसार अशी माहिती मिळाल्यामुळे पुढील वर्षी केंद्र सरकार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्याबाबत एक महत्त्वाची घोषणा करणार आहे. अशी अपेक्षा दिसत आहे. आता किमान पगारात चांगलेच वाढ होण्याची शक्यता आहे.
2024 मध्ये लोकसभा निवडणुका : मागील काही दिवसांपासून ही चर्चा होते की, आठवा वेतन आयोग येणार नाही. परंतु सातव्या वेतन आयोगानंतर पुढील वेतन आयोग आणायची तयारी चांगलीच सुरू आहे. या सर्व प्रकरणाबाबत प्रशासनाकडून कोणतेही आदेश अद्याप जाहीर केले नाहीत. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना कोणतेही नाराजी नसावी या अनुषंगाने सरकारने हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुढे नवे वेतन आयोग येईल असे सुद्धा संकेत दिसत आहेत.
केंद्र शासन स्वतः पुढील वेतन आयोगाची नव्याने मोठी घोषणा करेल आणि तेही 2024 च्या निवडणुकीपूर्वीच अशी शक्यता दिसत आहे. नव्या वेतन आयोगामध्ये काय काय होईल? काय काय होणार नाही? याची संपूर्ण जबाबदारी नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांनवर असणार आहे. त्यांच्या देखरेखी साठी हीच समिती स्थापन केली आहे. आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी नोकरदारांच्या पगारात वाढ पाहायला मिळेल. फिटमेंट फॅक्टर च्या बाबतीत सुद्धा काही बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासन प्रत्येक दहा वर्षातून एकदा वेतन हे स्थापन करतेच बघूया आता पुढे काय काय होईल.
आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !