Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee mahagai Bhatta vadh news , aicpi ] : सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासुन 3 टक्के महागाई भत्ता वाढ लागु होणार असल्याची मोठी महत्वपुर्ण माहिती समोर येत आहेत . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे , डी.ए वाढ निश्चित केली जाते .

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक माहे जुन 2024 पर्यंतची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ बाबत अंतिम आकडेवारी जाहीर झाली आहे . जुलै मधील डी.ए वाढीकरीता माहे जानेवारी ते जुलै महिन्यातील AICPI निर्देशांकाचा विचार केला जातो . महिन्यानिहाय निर्देशांक व अपेक्षित डी.ए वाढीची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहता येईल .

महिनाAICPIअपेक्षित डी.ए वाढ
जानेवारी138.950.84%
फेब्रुवारी139.251.44%
मार्च138.951.95%
एप्रिल139.452.43%
मे139.9052.91%
जुन141.453.44%

माहे जुन महिन्याच्या आकडेवारी जाहीर झाल्यानंतर डी.ए मध्ये 3 टक्के वाढ निश्चित झाली आहे . माहे मे महिन्यात ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक 139.90 इतका होता , तर माहे जुन महिन्यात सदर निर्देशाकांत 1.5 अंकांची वाढ झाली असून जुन महिन्यात निर्देशांकाचा आकडा 141.4  अंकावर पोहोचला आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये तब्बल 5347 जागेसाठी महाभरती, अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ ..

यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 मधील 3 टक्के डी.ए वाढ निश्चित झाली आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जुलै 2024 पासुन डी.ए चे दर 50 टक्के वरुन 53 टक्के असे सुधारित होणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *