Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Mahagai Bhatta (DA) Increase News ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे माहे जानेवारी 2024 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए चे दर बदलणार आहेत . या बाबत सरकारकडून लवकरच अधिकृत्त घेण्यात येणार आहेत .

महागाई भत्ता 5 टक्‍यांची वाढ : 01 जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना नविन डी.ए दर लागु करण्यात येत असतात , परंतु हे दर ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर निश्चित करण्यात येत असतात . ऑल इंडिया ची नविन आकडेवारी ही दर महिन्यांच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येत असते . सध्या माहे नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत .

आता फक्त माहे डिसेंबर महिन्यांचे निर्देशांक बाकी आहेत , माहे डिसेंबर 2023 चे निर्देशांक जाहीर झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए चे दर निश्चित करण्यात येतील . माहे जानेवारीची डी.ए दर निश्चित करताना मागिल वर्षातील जुलै ते डिसेंबर महिन्याचे AICPI निर्देशांक विचारात घेतले जाते .महिना नुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक पुढीलप्रमाणे आहेत .

महिना /वर्षेAICPIमहिना नुसार डी.ए वाढ दर ( % मध्ये )
जुलै 2023139.747.15
ऑगस्ट 2023139.247.15
सप्टेंबर 2023137.548.54
ऑक्टोंबर 2023138.449.08
नोव्हेंबर 2023139.150.40
डिसेंबर 202351 ( अंदाजे )

माहे नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी.ए वाढीचा विचार केला असता , एकुण महागाई भत्ता वाढ ही 50.40 टक्के पर्यंत जात आहे . तर माहे डिसेंबर 2023 मधील धरुन अंदाजे 51 टक्के पर्यंत डी.ए वाढेल .सध्या सरकारी कर्मचारी माहे जुलै 2023 पासून 46 टक्के दराने डी.ए लागु आहे . आता डी.ए चे दर हे 50 टक्के पार करणार असल्याने घरभाडे भत्ता मध्ये देखिल वाढ होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *