Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee mahagai Bhatta Shasan Nirnay ] : देशांमध्ये दिनांक 16 एप्रिल रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत , त्यापुर्वी पुढील महिन्यांत दिनांक 05 मार्च पासुन आचारसंहिता लागू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहेत .

आचारसंहिता पुर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्युज : आचार संहिता लागु होण्यापुर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मध्ये वाढ लागु केली जाईल , अशी माहिती समोर येत आहे . नुकतेच केद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा निधीवरील व्याज वाढविणे बाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . आत डी.ए वाढ करणेबाबत सरकारचा प्रस्ताव विचाराधीन आहे .

केंद्र सरकारकडून प्रथम केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 5 टक्के पर्यंत महागाई भत्ता वाढ करणेबाबत निर्णय ,घेण्यात येणार आहे . त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडून डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे . आचारसंहितामुळे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून देखिल डी.ए वाढीबाबतचा लगेच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहेत .

महागाई भत्ता मध्ये 05 टक्के पर्यंत मिळणार वाढ ( DA INCREASE ) : लोकसभेच्या निवडणुका असल्या कारणाने तसेच ऑल इंडिया ग्राह निर्देशांच्या आधारे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्तांमध्ये दि.01 जानेवारी 2024 पासुन 5 टक्के पर्यंत वाढ करण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहेत .

महागाई भत्तामध्ये 05 टक्क्यांची वाढ लागु झाल्यास , निश्चितच घरभाडे भत्ता मध्ये वाढ लागु होईल , कारण सातव्या वेतन आयोगानुसार डी.ए दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता व वाहन भत्तामध्ये वाढ होणे नियोजित असल्याने , सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबरोबरच घरभाडे भत्ता व वाहन भत्ता मध्ये देखिल वाढ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहेत . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने डी.ए मिळत आहे , त्यात आणखीण 5 टक्क्यांची भर घातल्यास  डी.ए चे दर हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *