लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या साठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये 42 टक्क्यांवर वरुन चक्क 50 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये चक्क 9,000/- रुपयांची प्रत्यक्ष वाढ होणार आहे .डी.ए वाढीसंदर्भात केंद्र सरकारकडून कधी निर्णय घेण्यात येणार आहेत तु पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पुढच्या महिन्यात होणार वाढ : माहे जुलै 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्के वाढून 42 टक्के दरांचा महागाई भत्ता हा 46 टक्के पर्यंत जाणार आहे .ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क 9,000/- रुपयांची थेट वाढ होणार आहे .महागाई भत्ता वाढीसंदर्भात केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ग्राहक निर्देशांक निर्देशित झाले नसले तरी एप्रिल पर्यंतच्या निर्देशांकाचा विचारक केला असता महागाई भत्ता हा 3 टक्के पेक्षा अधिक होत आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई जुलै 2023 मध्ये निश्चितच 4 टक्के वाढ होणार आहे .
महागाई भत्ता 50 टक्क्यावरुन जाणार परत शुन्य टक्क्यांवर : जानेवारी 2024 मध्ये परत महागाईचा विचार करुन किमान 4 टक्के वाढ झाल्यास निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्क्यांपर्यंत जावुन पोहोचणार आहे . नियमानुसार सातव्या वेतन आयोग लागु केला त्यावेळी डी.ए परत शुन्यावर आणला गेला .
केंद्र सरकारने भाकित केल्याप्रमाणे ऑटोमेटिक पे रिविजन सिस्टिमनुसार , 50 टक्क्यापेक्षा अधिक महागाई भत्ता झाल्यास सदरची रक्कम ही मुळ वेतनात मिळवून महागाई भत्ता परत शुन्य टक्के केला जाईल .ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये ऑटोमेटिक पे रिविजन सिस्टिमनुसार वेतनात वाढ होत जाईल .म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांमध्येच नविन वेतन प्रणालीनुसार वाढीव वेतनाचा लाभ मिळेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !