लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर , आपल्यासाठी DA वाढीबाबत आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे .सदर महागाई भत्ता मधील वाढ ही माहे जानेवारी 2023 पासून फरकास लागू करणेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे .
9% महागाई भत्ता वाढ : सदरची DA वाढ ही माहे जून महिन्याच्या वेतन देयकासोबत जानेवारी ते जून महिना पर्यंत सहा महिन्यांचे महागाई भत्ता फरक मिळणार आहे .सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये जानेवारी महिन्यापासून DA चा दर 212% वरून 221% करण्यात आला आहे , म्हणजेच DA मध्ये तब्बल 9% टक्के वाढ करण्यात आली आहे .
पाचवा वेतन आयोग DA : त्याचबरोबर पाचव्या वेतन अयोगानुसार वेतन घेण्याऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 16% ची बंपर वाढ करण्यात आलेली आहे , यापूर्वी सदर कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 396% DA दिला जात होता .आता जानेवारी 2023 पासून सदर कर्मचाऱ्यांना 412% DA वाढ महागाई भत्ता फरकास जून महिन्याच्या वेतनसोबत लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
पेन्शन धारकांना DA वाढीचा लाभ : त्याचबरोबर केंद्र सरकारच्या अधिनस्त केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांना देखील 396% वरून 412 टक्के DA वाढ लागू करण्यात आलेली आहे .केंद्र सरकारने DA वाढीचा लाभ सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटूंबनिवृत्ती वेतन धारकांना देखील लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !