लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्ता वाढ संदर्भात लवकरच मोठी अपडेट समोर येत आहेत .सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून वाढीव 4 टक्के लाभ डी.ए फरकासह लागु करण्यात आलेले आहेत .
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगाराचे पारडे आता अधिकच जड होणार आहेत . जानेवारी 2023 मध्ये डी.ए 4 टक्के वाढ केल्याने , एकुण महागाई भत्ता हा 42 टक्के झाला होता , आता पुन्हा एकदा डी.ए मध्ये दि.01 जुलै 2023 पासून आणखीण 4 टक्के वाढ होणार आहे .या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 46 टक्के पर्यंत पोहोचणार आहे , या संदर्भात केंद्र सरकारकडून नविन आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .
डी.ए वाढीची नविन आकडेवारी : केंद्र सरकारच्या कामगार विभागांकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात येत असते , हे आकडेवारी प्रत्येक महिन्याला मागील महिन्यांमधील महागाईच्या प्रमाणानुसार जाहीर करण्यात येत असते .माहे जुन महिन्यांची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .सदर आकडेवारीनुसार माहे जुन महिन्याचा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक हा 136.4 अंकावर पोहोचलेला आहे , यापुर्वीच्या महिन्यातील आकडेवारी पाहिली असता , मे महिन्याचा निर्देशांक हा 134.7 अंकावर होता .
यामुळे सदर निर्देशांकातील वाढलेली आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये तब्बल 4 टक्के वाढ होणार हे निश्चित झालेले आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांच्या वेतन देयकासोबत , 46 टक्के प्रमाणे डी.ए वाढ लागु करणेबाबत केंद्र सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
मिडीया रिपोर्टच्या मिळालेल्या माहितीनुसार येत्या 15 ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये जुलै पासून 4 टक्के वाढ करणेबाबत मोठा निर्णय होवू शकता , ज्याचा प्रत्यक्ष लाभ माहे सप्टेंबर 2023 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !