Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Mahagai Bhatta & New Payment Scale New Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नविन वर्षांमध्ये वाढीव 5 टक्के डी.ए व नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) ची भेट मिळणार आहे . या संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे .
महागाई भत्तामध्ये 5 टक्क्यांची वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जानेवारी 2024 मध्ये डी.ए वाढ होणार आहे . यामुळे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे मिडीया रिपोर्ट मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए बाबत आकडेवारी जाहीर करण्यात येत आहेत . माहे जुलै 2023 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ता हा 46 टक्के इतका झाला आहे .
तर माहे जानेवारी 2024 मध्ये परत 5 टक्के डी.ए वाढ होणार असल्याची आकडेवारी समोर येत आहेत . AICPI च्या निर्देशांकानुसार माहे जुलै 2023 मध्ये 139.7 अंक AICPI होता , तर ऑगस्ट 2023 मध्ये 139.2 अंकावर पोहोचला , तर माहे सप्टेंबर 2023 मध्ये ही आकडेवारी कमी होवून 137.5 अंकावर स्थिर झाली . तर माहे ऑक्टोबर मध्ये परत निर्देशांकामध्ये 0.90 अंकाची वाढ झाल्याने AICPI निर्देशांक 138.4 पर्यंत पोहोचला आहे . आता माहे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांची आकडेवारी बाकी आहे .
माहे ऑक्टोंबर 2023 पर्यंतच्या AICPI च्या आकडेवारीचा विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये 49.08 टक्के डी.ए वाढ अपेक्षित आहे . तर पुढील दोन महिन्यांतील अंदाजे आकडेवारींचा विचार केला असता , महागाई भत्ता हा 50.60 टक्के म्हणजेच 51 टक्के पर्यंत पाहोचेल .
New Pay Commission : आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीचा विचार करता , केंद्र सरकारकडून नविन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याच्या तयारीत आहेत . सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु करणे अपेक्षित असल्याने , वेतनरचना , येणारे खर्च या संदर्भातील सविस्तर आकडेवारींचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना नविन वर्षांमध्ये करण्यात येणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.