Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे . ती म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील जमा रक्कम परत करण्यास , केंद्र सरकारकडून नकार देण्यात आला आहे . यामुळे ज्या राज्य सरकारने परत जुनी पेन्शन ( Old Pension ) योजनाचा स्विकार केला आहे , अशा राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत NPS मधील जमा रक्कम परत प्राप्त झालेली नाही .

अद्यापर्यंत देशांमध्ये झारखंड , राजस्थान ,हिमाचल प्रदेश , छत्तीसगढ , पंजाब राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन परत जुनी पेन्शन प्रणाली लागु करण्यात आली आहे . परंतु सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील जमा रक्कम अद्यापर्यंत परत मिळालेली नाही . राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) नियमावलीनुसार , जमा रक्कम परत करण्याची तरतुद नाही . यामुळे जर सदर कर्मचाऱ्यांना जमा रक्कम परत करावयाची असल्यास राष्ट्रीय पेन्शन योजना नियमावलींमध्ये बदल करणे अपेक्षित आहे .

नुकतेच केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी स्पष्ट केले होते कि , राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील जमा रक्कम कर्मचाऱ्यांना परत करता येणार नाही . तर या जमा रक्कमेवर पेन्शनच घ्यावी लागेल . जुन्या पेन्शन योजनांमध्ये भविष्य निर्वाह निधी योजना मध्ये ,जमा रक्कम कर्मचाऱ्यांना आवश्यकेनुसार कधीही काढता येते . परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील कडक नियमावली मुळे सदरची रक्कम काढता येणार नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे .

हे पण वाचा : केंद्र सरकारनंतर कोणत्या राज्यांनी किती टक्के DA वाढ लागू केली ? जाणून घ्या सविस्तर !

वरील नमुद राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शचा लाभ लागु करुन देखिल सदर कर्मचाऱ्यांचे NPS मधील जमा रक्कम परत मिळत नाही ही एका धक्कादायक बाब आहे .यावर केंद्र सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा असे जुनी पेन्शन योजना लागु करणाऱ्या राज्य सरकारकडून विनंती करण्यात आली आहे .

नुकतेच कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल लागला असून , काँग्रेसने मोठ्या संख्याबळासह सत्ता स्थापन केली असून , काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार , लवकरच जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागु करण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटकचे नव निर्वाचित मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी केली आहे .

शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती , इतर चालु घडामोडींच्या अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *