Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee hra update news ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे . यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मध्ये वाढ होणेबाबत चाहुल लागली आहे , कारण सातवा वेतन आयोगांमध्ये डी.ए निश्चित वाढीनंतर एचआरमध्ये वाढ प्रविष्ठ करण्यात आलेली आहे .
ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 25 टक्के पर्यंत वाढला होता , त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता मध्ये वाढ करण्यात आली त्यानंतर महागाई भत्ता 50 टक्क्यांचा आकडा गाठेल , त्यावेळी घरभाडे भत्ता मध्ये वाढ करण्याचे नियोजित करण्यात आलेले आहेत . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत परत डी.ए वाढ लागु होणार आहे , यामुळे कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता अदा केला जाणार आहे .
याबाबत केंद्र शासनामार्फत दिनांक 04 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाच्या दिनांक 12.03.2024 रोजीच्या कार्यायीन ज्ञापन नुसार दिनांक 01.01.2024 पासुन डी.ए मध्ये 46 टक्के पासुन 50 टक्के अशी सुधारणा करण्यात आलेली आहे .
त्यानुसार सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 01.01.2024 पासुन घरभाडे भत्ता मध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणानुसार 30 टक्के , 20 टक्के , 10 टक्के अशी सुधारणा करण्याचे सशोधित करण्यात आलेली आहे . या संदर्भातील केंद्र शासनांकडून दिनांक 04 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर कार्यालयीन ज्ञापन पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
सदर केंद्र शासनांच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्यात येईल ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.