7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये झाला मोठा बदल ; आता कर्मचाऱ्यांना मिळणार नाही घरभाडे भत्ताचा लाभ , पहा सविस्तर !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सध्या घर भाडे भत्ता मिळण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे , काही शासकीय कर्मचाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसण्याची माहिती समोर येत आहे. सातवा वेतन आयोग याप्रमाणे HRA चे नियम पूर्णपणे बदललेले आहेत. या संदर्भाबद्दल केलेल्या शासनाच्या विभागाकडून आता नवीन नियम जाहीर केले आहेत. वित्त मंत्रालय अंतर्गत खर्च विभागाने सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांकरिता घरभाडे भत्ता मध्ये बदल करण्यात आला आहे .

दोन कर्मचारी एका निवासस्थानक असतील तर HRA चा लाभ लाभ मिळणार नाही . सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार घरबाडे भत्ता हा शासकीय कर्मचारी करिता ज्या ठिकाणी नोकरीला असेल त्या ठिकाणी राहण्याची सोय म्हणून दिला जातो. आता नवीन नियम आला आहे त्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही वाटपाचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे दोन व्यक्ती एकाच निवासस्थानात राहत असतील तर त्यांना वाढीव घरभाडे भत्ता मिळणार नाही. या कर्मचाऱ्यांकरिता केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या क्षेत्रातील नव उपक्रम किंवा महानगरपालिका राष्ट्रीयकृत बँका जीवन यासारख्या निम शासकीय संस्थेचे कर्मचारी असतील तर त्यांना देखील हा नियम लागू होणार आहे .

नवीन नियमानुसार आता कर्मचारी हा स्वतः पालकांना किंवा मुलाला किंवा त्यांच्या मुलीला दिलेल्या घरामध्ये राहत असल्यास याशिवाय शासकीय कर्मचारी यांच्या जोडीदाराला केंद्र सरकार मार्फत किंवा राज्य सरकार मार्फत सार्वजनिक क्षेत्रात निवासस्थान उपलब्ध झाले आहे. त्यापैकी एकाला HRA चा लाभ घेता येईल , दुसरा जोडीदार HRA लाभास अपात्र असेल .

हे पण वाचा :Post office : “पोस्ट ऑफिस बचत योजना” या योजनेत फक्त 50 रुपयांची गुंतवणूक करून मिळेल 35 लाखांचा परतावा !

त्याचबरोबर जे शासकीय कर्मचारी स्वतःच्या घरात वास्तव करून देखील घरभाडे भत्ताचा लाभ घेत असतील अशा कर्मचाऱ्यांचे देखील HRA कपात केला जाणार आहे , पण TA चा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणानुसार HRA दिला जात असतो .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment