Good News : सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 3 मोठे आर्थिक लाभ ;

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Good News ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ प्राप्त झाले आहेत . यामध्ये महागाई भत्ता , डी.ए फरक तसेच वेतन याबाबत आर्थिक लाभ अनुज्ञेय आहेत .

महागाई भत्ता मध्ये वाढ  :  केंद्र सरकारने आचार संहिता पुर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांच्या महागाई भत्यांमध्ये वाढ केली आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2024 पासून एकुण 50 टक्के दराने महागाई भत्ता , डी.ए फरकासह मिळणार आहे . याच धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त आखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारकांना डी.ए वाढ करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

आचार सहिंता सुरु झाल्याने , राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय लांबणीवर गेला आहे , यामुळे सदर डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय हा जून महिन्यात घेतला जाईल .

महागाई भत्ता फरकाचा लाभ : केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा लाभ मार्च पेड एप्रिल वेतनासोबत अनुज्ञेय होणार असून , सदर वेतन देयकासोबत जानेवारी व फेब्रुवारी या 2 महिन्यांतील डी.ए फरक अदा करण्यात येणार आहे .

डी.ए चे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्याने , सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तामध्ये देखिल वाढ होणार आहे , वास्तव्याच्या ठिकाणांनुसार 1 टक्के ते 3 टक्के पर्यंत घरभाडे भत्ता दर वाढ होणार आहे . सध्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार 9 % , 18 % , 27% दराने घरभाडे मिळतो , तर आता डी.ए मध्ये 50 टक्के वाढ झाल्याने आता , कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 10 टक्के , 20 टक्के व 30 टक्के अशी वाढ अनुज्ञेय होणार आहे .

मार्च वेतन : माहे मार्च पेड इन एप्रिल महिन्याचे वेतन हे रमजान ईद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन अदा करणे बाबत राज्य शासनांच्या शिक्षण आयुक्तालय मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

Leave a Comment