Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government Employee Good News , other 6 Allowance Increase News ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य लवकरच चमकणार आहेत , कारण केंद्र सरकारने महागाई भत्तामध्ये वाढीनंतर इतर 06 भत्यांमध्ये देखिल वाढ होणे अपेक्षित आहे .
महागाई भत्ता वाढीवर इतर भत्ते अवलंबून : सातव्या वेतन आयोगानुसार इतर भत्यांमधील वाढ ही डी.ए वर अवलंबून ठेवण्यात आलेली आहे . यामुळे सध्या केंद्र सरकारने माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु , केल्याने एकुण डी.ए दर हे 50 टक्के झाले आहे . यामुळे इतर भत्यांमध्ये वाढ करणेबाबत , नियोजित डी.ए चे दर गाठले आहेत .
या 06 प्रकारच्या भत्यांमध्ये होणार वाढ : यांमध्ये डी.ए वाढीवर अवलंबून असणारे घरभाडे भत्ता , वाहतूक भत्ता , बालशिक्षण भत्ता , प्रतिनियुक्ती असणाऱ्यांना दिला जाणारा प्रतिनियुक्ती भत्ता , दौऱ्यातील प्रवास भत्ता , नॉनकॅश प्रवासी भत्ता या 06 प्रकारच्या भत्यांमधील वाढीसह पेन्शनधारकांचा निश्चित वैद्यकीय भत्ता तसेच उच्च पात्रता भत्ता तसेच रजा नगदीकरणे , नॉनकॅश , सराव भत्ता यांमध्ये देखिल वाढ निश्चित आहे .
7 वा वेतन आयोगानुसार भत्यांमधील वाढ नियोजित : सातवा वेतन आयोगानुसार , महागाई भत्ताचे दर ज्यावेळी 50 टक्के पार करेल त्यावेळी वरील नमुद 06 भत्यांमध्ये वाढ लागु होणे अपेक्षित आहे . हे प्रमाण 25 टक्क्यांचे आहे , डी.ए मधील दर 25 टक्यांच्या वाढीनंतर वरील 06 प्रकारच्या भत्यांमध्ये वाढ लागु करण्यात येते . ज्यावेळी महागाई भत्ता हा 25 टक्के झाला त्यावेळी वरील 06 प्रकारच्या भत्यांमध्ये वाढ लागु करण्यात आली होती .
वरील 06 भत्यांमध्ये वाढ कधी होणार : माहे जानेवारी 2024 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांना एकुण डी.ए हा 50 टक्के प्रमाणे लागु करण्यात आलेला असल्याने , वरील भत्यांमध्ये वाढीकरीता 50 टक्के पेक्षा अधिक डी.ए होणे आवश्यक आहे . यामुळे जुलै 2024 मध्ये परत डी.ए वाढीनंतर डी.ए चे दर निश्चितपणे 50 टक्के पेक्षा अधिक होईल , यामुळे सदर 06 प्रकारचे भत्ते हे माहे जुलै 2024 पासून लागु होतील .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.