Live Marathipepar [ shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप करीता शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे वाटप या लेखाशिर्षाखाली अग्रिमे मंजुर करण्यात आले आहेत . या संदर्भात दिनांक 09.11.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 08.07.1999 व दिनांक 06.11.1990 तसेच 20.02.2015 त्याचबरोबर सुधारित शासन निर्णय दिनांक 02.02.2021 नुसार तसेच मुंबई वित्तीय नियम 1959 नियम 134 परिशिष्ट 26 मधील विहीत नियम / अटींचे पालन करुन घरबांधणी अग्रिम मंजूर करण्यात येते .
याकरीता घरबांधणी अग्रिम संबंधित अर्जदाराने सर्व बाबींची कागतदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक असणार आहेत .तसेच अर्जदार हे सेवानिवृत्त होण्यापुर्वी त्यांच्याकडून सदर अग्रिमांची मंजूर करण्यात आलेल्या संपुर्ण व्याजासह वसुली होईल याची दक्षता घेणे आवश्यक असणार आहे . तसेच जमीन खरेदी करुन घर बांधणे या प्रयोजनासाठी अग्रिमाचा पहिला हप्ता मंजूर केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर करण्याची शिफारस करण्यापुर्वी अर्जदाराच्या घराचे मंजूर आरोखडे , स्थानिक प्राधिकारणाच्या मंजूरी आदेश घ्यावी लागेल .
सदर शासन निर्णयान्वये राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिमांची रक्कम मंजुर करण्यात आलेली आहे , सदर शासन निर्णयांमध्ये मंजूर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव व मंजूर घरबांधणी रक्कम देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील विधी व न्याय विभागांकडून दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.