लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र नागरी सेवानियमानुसार , महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्ये पार पाडत असताना मादक पेय / औषधांचे सेवन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे .परंतु शासकीय कर्मचारी आपले वैयक्तिक आयुष्य जगत असताना देखिल किंवा कर्तव्यावर नसताना मादक द्रव्यांचे सेवक करु शकतो का , याबाबत नियम काय सांगतो पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शासकीय कर्मचारी म्हणजे सरकारचे एक घटक असतात , प्रशासन चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते .यामुळे ही प्रशासकीय जबाबदारी सांभाळत असताना , कर्मचाऱ्यांकडून झालेली चूक ही प्रशासनांची चुक समजण्यात येत असते . शासकीय कर्मचारी सुट्टीवर असला तरी त्यांच्या कर्तव्यातुन मुक्त होत नसतो . यामुळे कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आयुष्य जगत असताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहेत .
कर्मचारी जर वैयक्तिक आयुष्यांत मादक पदार्थांचे सेवण करत असला तर त्यांना काही अटींचे पालन करणे आवश्यक आहेत . महाराष्ट्र नागरी सेवानियमानुसार , शासकीय कर्मचाऱ्यांने सार्वजनिक ठिकाणी मादक पेय किंवा मादक औषधांचे सेवन करण्याचे टाळावे . त्याचबरोबर नशा जास्त प्रमाणांत झाल्याच्या अवस्थेत गर्दीच्या / सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना महिना अखेर दिलासादायक शासन निर्णय निर्गमित , दि.31.05.2023
त्याचबरोबर मादक द्रव्यांचे सेवन प्रमाणांपेक्षा अधिक करु नये अशी नियमावली महाराष्ट्र नागरी सेवानियमांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे .जर वरील नियमांचे पालन शासकीय कर्मचाऱ्यांकडून न केल्यास , सदर कर्मचारी हा दंडास पात्र ठरेल .यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांने वैयक्तिक आयुष्यात देखिल वरील नियमावलीचे पालन करणे आवश्यक असणार आहे .
शासकीय कर्मचारी , निमशासकीय , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !