Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत आणखीण 4 टक्के डी.ए लाभ फरकासह लागु करण्यात येणार आहे , परंतु एनपीएस कर्मचाऱ्यांची असणारी जुनी पेन्शनची मागणी पुर्ण होणार नाही , असे ठामपणे सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत .

केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना कभी खुशी कही गम असा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांपासून आणखीण वाढीव 4 टक्के डी.ए वाढीबाबत , वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत , ज्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 46 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . ही  सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ठरणार आहे , पंरतु जुनी पेन्शन बाबत केंद्र सरकार स्पष्ट नकार देत आहेत .

मोदी सरकारकडून मंगळवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये एका सदस्यांकडून सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कधी लागु करण्यात येईल , असा प्रश्न उपस्थित केला असता , केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून जुनी पेन्शनवर होणाऱ्या खर्चाचा पाडाच सांगण्यात आला आहे . यामुळे एनपीएस कर्मचाऱ्यांना जुनी पेंनशन योजना लागु केल्यास , भविष्यात पेन्शनवरचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल व सरकार दिवाळखोरीत निघेल यामुळे जुनी पेन्शन योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये लागु करण्यात येणार नसल्याचे केंद्राकडून स्पटीकरण देण्यात आले आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुलै पेड इन ऑगस्ट चा पगार ठरणार लाभदायक , पगारासोबतच मिळणार हे वाढीव लाभ !

सध्या दिल्ली येथे दिनांक 01 ऑगस्ट पासून देशभरातील लाखो NPS धारक सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहेत . यामुळे केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देताना सांगितले कि , कर्मचाऱ्यांच्या दबावाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बळी पडणार नसुन , जुनी पेन्शन योजना कोणत्याही स्थितीमध्ये लागु केली जाणार नाही .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *