Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee DA Increase Nirnay ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यांमध्ये वाढ करणे संदर्भात केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे , माहे जानवारी 2024 पासुन सदर वाढीव महागाई भत्याचा लाभ प्राप्त होणार आहे , या संदर्भात अधिकृत वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
डी.ए मध्ये 4 टक्के वाढ : ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 5 टक्क्यांची वाढ अपेक्षित होती , परंतु काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यांमध्ये दि.01 जानेवारी 2024 पासुन 4 टक्यांची वाढ लागु करणेबाबचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2024 पासुन डी.ए फरकासह वाढीव 50 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .
या निर्णयामुळे केंद्रीय तिजोरीवर तब्बल 13 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे , केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकाच्या पुर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डी.ए वाढीचा महत्वपुर्ण दिलासादाय निर्णय घेण्यात आला आलेला आहे . या संदर्भात अधिकृत्त माहीती केंद्रीय राज्य वित्त मंत्री श्री.पंकज चौधरी यांनी मिडीयास दिली आहे .
महागाई भत्ता फरक मिळणार ( DA Arrears ) : सदरचा वाढीव महागाई भत्ताचा फरक माहे मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत माहे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे . यामुळे माहे मार्च पेड एन एप्रिल मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे . या निर्णयानंतर आता राज्य सरकारकडून देखिल डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे . सदर डी.ए वाढीचा लाभ देशतील तब्बल 1 कोटी सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारक यांना होणार आहे .
HRA मध्ये होणार वाढ : महागाई भत्ता हा 50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर सातव्या वेतन आयोगांमध्ये घरभाडे भत्तांमध्ये वाढ नियोजित आहे , यामुळे सध्या माहे जानेवारी 2024 पासुन डी.ए मध्ये 4 टक्के वाढ लागु करण्यात आल्याने , एकुण डी.ए हा 50 टक्के इतका झाला आहे , आता माहे जुलै 2024 मधील डी.ए वाढीनंतर एकुण डी.ए हा 50 टक्के पेक्षा अधिक होईल , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता मध्ये वाढ लागु होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.