सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच मिळणार 53% DA वाढीचा लाभ !

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee DA increase news ] : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्याचा (DA ) लाभ लागू करण्यात येतो , यामध्ये माहे जानेवारी व जुलै महिन्यात महागाई भत्ता  (DA) वाढविण्यात येतो . सध्या माहे जुलै 2024 चा महागाई भत्ता बाकी आहे .

महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या कामगार विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या अनुसार निश्चित करण्यात येतो . म्हणजेच कामगार विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या AICPI च्या निर्देशांकानुसार , महागाई भत्त्यामध्ये वाढ निश्चित केली जाते .

यामध्ये सद्यस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे . यामध्ये आता ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे . त्याबाबत केंद्रिय वित्त विभागाने प्रस्ताव सादर केलेला आहे .

सदरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला असून , लवकरच सदर प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे . सध्या देशामध्ये निवडणुकीचे वातावरण सुरू असल्याने , कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरिता सदर महागाई भत्त्याचा लाभ देणेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल .

म्हणजेच दिवाळी सणापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे . सदर महागाई भत्ता चा लाभ जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार असल्याने , जुलै पासून महागाई भत्त्याची (DA) थकबाकी दिली जाणार आहे .

महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक होणार असल्याने सातवा वेतन आयोगानुसार , घर भाडे भत्ता (HRA ) मध्ये देखील मोठी वाढ होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे .

Leave a Comment