Spread the love

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतीच आता सणासुदीच्या कालावधीमध्ये भेट मिळाली आहे. दिवाळीपूर्वी आता बोनस म्हणून महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ केली जाणार आहे. तसेच मागील तीन महिन्याचे थकबाकी सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असल्यामुळे कर्मचारी सुद्धा तितकेच खुश आहेत. परंतु येणारे नवीन वर्ष त्यांच्यासाठी नक्कीच यापेक्षाही अधिक चांगल्या भेटी घेऊन येऊ शकते. अशी माहिती कानावर पडली आहे. विशेष बाब म्हणजे महागाई भत्ता च्या आघाडीवर आत्ताच एक नवीन आनंदाची बातमी मिळाली आहे.

एक जुलै 2023 पासून 46% इतका महागाई भत्ता करण्यात आला आहे (7th Pay Commission pay matrix). तिथून पुढे आता 2024 मधील जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता सुधारेल आणि ही सुधारणा आतापर्यंतची अगदी मोठी सुधारणा होऊ शकते.

महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ होऊ शकते का? : केंद्र सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांकरिता 2024 हे वार्षिक कालखंड अनेक विविध आर्थिक बाजूने महत्त्वाचे ठरेल. नव्या वेतन आयोगा विषयी ठोस अशी मोठी चर्चा या ठिकाणी होऊ शकते. यासोबतच महागाई भत्ता अशावेळी 50% च्या पुढे सुद्धा जाऊ शकतो (7th Pay Commission news). जर आपण ट्रेंड पाहिला तर अशावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये मागील कित्येक वेळा चार टक्क्यांनी वाढ झाल्याची आपण बघितली. परंतु नवीन वर्षामध्ये त्यांना अगदी मोठी भेट मिळण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत बघितले तर सर्वात मोठी वाढ 5 टक्के पर्यंत असू शकते.

डीएचा स्कोअर ठरवणार एआयसीपीआय निर्देशांक- त्यामध्ये आता खरोखरच 5% पर्यंत वाढ होईल का? असा प्रश्न कित्येक नागरिकांना पडला आहे. तर सध्याच्यानुसार महागाई बघितली तर महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता दिसत आहे (da hike news). अशी तज्ञ लोकांनी वर्तवली. तसेच झाले तर पाच टक्के ची वाढ नक्कीच दिसून येईल. महागाई भत्त्याची गणना करत असताना एआयसीपीआय निर्देशांक प्रमाणे केली जाते. निर्देशांकाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामधून या ठिकाणी गोळा करण्यात आलेल्या भत्त्याच्या विविध आकडेवारीप्रमाणे महागाई व त्याच्या तुलनेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा भत्ता नक्की किती वाढला पाहिजे या बाबी दिसून येतात..

सद्यस्थिती काय आहे? : सध्याची परिस्थिती पाहत असताना ऑगस्ट महिन्यामध्ये तसेच जुलै महिन्याचे ए आय सी पी आय निर्देशांक प्रमाणे आकडे या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. लवकरच आता सप्टेंबरमधील आकडेवारी समोर येणार आहे. सध्याचा निर्देशांक बघितला तर 139.2 पर्यंत स्थिर आहे. ज्यामुळे आता महागाई भत्ता 47.18 टक्क्यांवर या ठिकाणी पोहोचलेला दिसत आहे. सप्टेंबर मधील हा आकडा बघितला तर 48.50% च्या पुढे जाण्याची शक्यता होती. असा अंदाज सुद्धा वर्तवला आहे (da news today). तिथून पुढे जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता नक्की किती वाढेल हे ऑक्टोबर नोव्हेंबर तसेच डिसेंबरच्या आकडेवारीवर ठरवली जाईल परंतु त्यासाठी 2023 मधील डिसेंबर महिन्याच्या एआयसीपीआय चा निर्देशांकप्रमाणे आकड्याची जी काही वाट असेल ती पहावी लागेल..

महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे जुलैपासून डिसेंबर 2023 या कालखंडामध्ये केंद्रीय कर्मचारी याच्यासाठी एआयसीसीपीआय चे जे काही आकडे असतील ते महागाई भत्ता निश्चित करतात. महागाई भत्ता जवळपास 48 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा दिसत आहे. आता चार महिन्यांचा या ठिकाणी आकडा येईल त्यामध्ये आणखी तीन टक्क्याची वाढ होईल. अशी शक्यता तज्ञ लोकांनी वर्तवली जानेवारी 2024 मध्ये बघितला तर महागाई भत्ता 5% पर्यंत नक्कीच वाढू शकतो. असा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *