Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee DA & HRA increase update ] : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जुलै 2024 पासून 3 टक्के वाढ करण्यात आली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एकूण 53% दराने महागाई भत्ता मिळणार आहे .

DA मध्ये वाढ : जुलै 2024 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3% वाढीनंतर एकूण महागाई भत्ता 53% झाल्याने , इतर देय वेतन व भत्ते यामध्ये वाढ अपेक्षित आहे .  यामध्ये प्रामुख्याने घरभाडे  (HRA) भत्ता मधील वाढ निश्चित आहे .

महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्यास , घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करणे सातवा वेतन आयोगानुसार (7th  pay commission) नियोजित आहे . जुलै 2024 मध्ये महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्याने , सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून घरभाडे भत्तामध्ये , सुधारणा करण्यात येणार आहे . घरभाडे भत्ता मधील सुधारणा वास्तव्याच्या ठिकाणानुसार पुढील प्रमाणे करण्यात येईल .

यामध्ये X श्रेणीतील वास्तव्यास असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 30% घरभाडे भत्ता सुधारित करण्यात येणार आहे . तर Y श्रेणीतील वास्तव्यास असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के घरभाडे भत्ता अदा केला जाईल ,  तर Z श्रेणीतील वास्तव्यास असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 टक्के घरभाडे (HRA) भत्तामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे .

याबाबत केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून लवकरच अधिकृत कार्यालयीन ज्ञापन निर्गमित करण्यात येणार आहे . या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी घरभाडे भत्ता (HRA ) मध्ये सुधारणा करणे संदर्भात सविस्तर शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयामध्ये महागाई भत्तामध्ये 50 टक्के पेक्षा अधिक वाढ झाल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित HRA लागू करण्याचे नियोजित आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *