Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना कोरोना कालावधीमधील 18 महिने डी.ए थकबाकीबाबत केंद्रीय स्तरावर कामगार युनियन व केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठी चर्चा सुरु होत आहे .

कामगार युनियन कडून मागील डी.ए थकबाकी संदर्भात निवेदन देवून , सदर 18 महिने कालावधीमधील वन टाईम सेटलमेंट करावे अथवा मागील डी.ए थकबाकीची रक्कम अदा करावी असे निवेदनांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . वन टाईम सेटलमेंट म्हणजे मागील डी.ए ची थकबाकी न देता , एकाच वेळी डी.ए मध्ये वाढ करण्यात येईल .

नुकतेच केंद्र सरकारकडून जुलै 2023 मधील डी.ए वाढीबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत , त्याचबरोबर केंद्र सरकारकडून 18 महिने कालावधीमधील डी.ए बाबत देखिल सकारात्मक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . पुढील वर्षी लोकसेभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने , मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जात आहेत .

हे पण वाचा :Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात उच्च न्यायालयाने दिला मोठा महत्वपुर्ण / दिलासादायक निर्णय !

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय पेन्शन योजनेंमध्ये सुधारणा करुन जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लागु करण्यात यावी या प्रमुख मागणींनंतर मागील 18 महीने कालावधीमधील डी.ए थकबाकी अदा करवी अशी मोठी मागणी करण्यात आलेली असल्याने , केंद्र सरकारकडून या दोन्ही मागणींवर तोडगा काढण्यासाठी विशेष समितीचे गठण करण्यात आलेले आहेत .

या 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकी लागु केल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 2 लाख 18 हजार पेक्षा अधिक थकबाकीचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *