Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee 18 month DA Arrears ] : सरकारी कर्मचाऱ्यांना कोराना काळातील 18 महिन्यांची महागाई भत्ता फरक बाबत , मोठी अपडेट समोर येत आहे . सदर कालावधीमधील 18 महिने थकबाकी निवडणुकांपुर्वीच दिली जाणार असल्याची मोठी बातमी मिडीया रिपार्टनुसार समोर येत आहे .
कोरोना काळांमध्ये दिनांक 01 जानेवारी 2020 ते दिनांक 01 जुलै 2021 या 18 महिने काळांमध्ये केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठविण्यात आला होता . सदर 18 महिने काळातील डी.ए थकबाकी देणेबाबत लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत , केंद्रीय अर्थ राज्य मंत्री श्री.पंकज यांनी उत्तर देताना सांगितले होते कि , सदर काळांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा डी.ए गोठवून सदर डी.ए ची रक्कम ही इतर आरोग्यविषय सोयी सुविधा साठी वापरण्यात आला आहे .
यामुळे सदर काळातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार नाही असे नमुद करण्यात आले होते . परंतु कोरोना काळांमध्ये सरकारी कर्मचारी हे कामावर कार्यरत होते , शिवाय कोरोना काळांमध्ये महागाईचे प्रमाण अधिकच वाढले होते . यामुळे वाढत्या महागाईच्या प्रमाणनुसार डी.ए वाढ लागु करणे आवश्यक असल्याचे कामगार युनियनचे म्हणणे आहे .
सदर 18 महिने काळावधीमधील डी.ए थकबाकी न मिळाल्याने , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळाणाऱ्या लाभांमध्ये मोठी तफावत असून येत आहे . यामध्ये सेवानिवृत्ती उपदान , पेन्शन रक्कम , तसेच इतर सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभांमध्ये कमतरता दिसून येत आहेत .
निवडणूकाच्या पार्श्वभुमीवर कर्मचाऱ्यांची मोठी मागणी : येत्या एप्रिल / मार्च 2024 मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्याने , सरकारी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागणी पुर्ण करण्यासाठी सरकारकडे जोर धरत आहेत . यांमध्ये जुनी पेन्शन योजना , निवृत्तीचे वय इ. यांमध्ये 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकी अदा केले जावू शकते .
कारण 18 महिने कालावधीमधील रक्कम मिळावी याकरीता सेवानिवृत्त पेन्शन धारक तसेच सरकारी कर्मचारी अधिकच जोर धरत आहेत , यामुळे सरकारकडून या मागणीवर निश्चितच तोडगा काढण्याची शक्यता आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.