Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे , तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिलासा देत मुलांचा सांभाळ / काळजी ( Child Care Leave )  घेण्यासाठी तब्बल 730 दिवसांची दिर्घ सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

लोकसभेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मा.जितेंद्र सिंह बोलताना सांगितले कि , महिला सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत लहान मुलांचा सांभाळ ( मुलांच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत ) करण्यासाठी 730 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा देण्यात येत असते . त्याचप्रमाणे एकल पुरुष कर्मचारी ( यांमध्ये विधुर / घटस्फोटित कर्मचाऱ्यांचा समावेश होतो ) यांना देखिल महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे 730 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा घेवू शकतील असे नमुद करण्यात आले .

सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा रजा नियम 1972 च्या नियम 43-सी नुसार महिला व सिंगल असणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा ( CCL ) मंजुर करण्यात येत असते , यापुर्वी यांमध्ये केवळ महिला कर्मचाऱ्यांना मिळत , आता यांमध्ये सुधारणा करण्यात येवून सिंगल / एकल पुरुष कर्मचाऱ्यांना देखिल सदर बाल संगोपन रजेचा लाभ लागु करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय – सा.प्र.विभाग !

हे पुरुष कर्मचारी असतील पात्र : केंद्र सरकारी नागरी रजा अधिनियम 1972 नियम 43 – सी अंतर्गत 730 दिवसाची रजेसाठी पुरुष कर्मचारी हे सिंगल , घटस्फोटित अथवा विधूर असणे आवश्यक असणार आहेत , असे कर्मचारी हे सदर बालसंगोपन रजेसाठी पात्र ठरणार आहेत .

हे पण वाचा : लाईट बिलाची चिंता संपली! घराच्या छतावर आजच बसवा मोफत सोलर पॅनल; सरकार देत आहे अनुदान; त्वरित अर्ज करा;

ही रजा मोठ्या दोन मुलांच्या वयांच्या 18 वर्षापर्यंतच घेता येते , परंतु पाल्य जर दिव्यांग असेल अशा स्थितीमध्ये मुलाच्या वयोमर्यार्देची कोणत्याही प्रकारची अट असणार नाही .या निर्णयामुळे सरकारी महिला कर्मचाऱ्यांप्रमाणेच पुरुष कर्मचाऱ्यांना देखिल रेजेचा मोठा लाभ प्राप्त झाला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *